माई, तुम्ही कुंकू का लावता? माईसाहेबांच्या आठवणींनी रामदास आठवले गहिवरले

"माईसाहेब कुंकू लावायच्या तेंव्हा मी त्यांना एकदा विचारले, माई, तुम्ही कुंकू का लावता ? त्यावर माई म्हणाल्या,माझे पती अमर आहेत म्हणून कुंकू लावते अशी भावपूर्ण आठवण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज माझ्या साहेबांचा जयंतीच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना दिली.;

Update: 2022-01-27 18:45 GMT

"माईसाहेब कुंकू लावायच्या तेंव्हा मी त्यांना एकदा विचारले, माई, तुम्ही कुंकू का लावता ? त्यावर माई म्हणाल्या,माझे पती अमर आहेत म्हणून कुंकू लावते अशी भावपूर्ण आठवण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज माझ्या साहेबांचा जयंतीच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना दिली.

"माईंना दादरच्या एका हॉटेलात खायला भारी आवडत असे, त्यामुळे मी गेलो की त्या मला घेऊन त्या हॉटेलात जात , त्याकाळात माझ्याकडे पैसे नसायचे, माई त्यांचे आणि माझे असे दोघांचे बिल माई भरत असत.माईसाहेबांची इच्छा असायची की समाजाने बुद्ध धर्माप्रमाणे आचरण केले पाहिजे, त्या त्याचा आग्रह धरत होत्या, असं आठवले म्हणाले.

माईसाहेबांचे देशात आणि महाराष्ट्रात स्मारक व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे, एखाद्या मेडिकल कॉलेजला किंवा मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे, त्याच्या मार्फत स्मारक करण्याच्या देखील विचारात आहे.

काही राजकीय आणि माईंचा द्वेष करणाऱ्या लोकांनी माईच्या विरोधात अपप्रचार केला, त्यामुळे त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली, मात्र राजा ढाले, नामदेव ढसाळ, इतर नेते व आम्ही माईच्या सोबत ठामपणे उभे राहिलो असे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले शेवटी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News