नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा कोकणात किती प्रभाव पडला?

Update: 2021-08-29 15:13 GMT

सध्या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाने टोक गाठले आहे. भाजपने नारायण राणे यांना केंद्रात मंत्री पद दिल्यानंतर शिवसेनेविरोधात नारायण राणे यांच्या टीकेची धार अधिकच तीव्र झाली. नारायण राणे यांना भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणूकीचा विचार करुन मंत्री पद दिलं आहे.

मंत्री पद मिळाल्यापासून माध्यमांशी बोलताना जपून असा सल्ला मोदी यांनी दिला होता. तसंच 15 ऑगस्ट पर्यंत कोणीही स्वत:च्या राज्यात जाणार नाही. अशा सूचना मोदी यांनी केल्या होत्या. 15 ऑगस्ट नंतर केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या सर्व मंत्र्यांची जनआशिर्वाद यात्रा भाजपने आयोजीत केली होती.

या यात्रेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सीमा ओलांडली. मुख्यमंत्र्यांच्या कानामागं देण्याची भाषा नारायण राणे यांनी केली. मात्र, नारायण राणे यांच्या या टिकेमुळे तसंच जनआशिर्वाद यात्रमुळे कोकणात भाजपची ताकद वाढली आहे का? राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर अनिल परब यांना नोटीस आली आहे. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा आणखी वाढणार का? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी मॅक्समहाराष्ट्रच्या 'टू द पॉइंट' या कार्यक्रमात तज्ज्ञांसोबत केलेले विश्लेषण नक्की पाहा. 

Full View

Tags:    

Similar News