Bharat Jodo Yatra : देशाला नवा गांधी मिळाला आहे - माजी आमदार राहुल बोंद्रे

Update: 2022-11-18 10:18 GMT

 राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. त्याबाबत माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी मॅक्स महाराष्ट्रचे स्पेशल सिनियर करस्पाँडंट विजय गायकवाड यांच्याशी बोलताना आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना राहुल बोंद्रे (Rahul bondre) म्हणाले की, महात्मा गांधींच्या (Mahatma gandhi) पदस्पर्शाने पावन झालेल्या बुलढाण्याच्या भूमीमध्ये राहुल गांधी येत आहे. एक प्रकारे अहिंसावादी भारताचा हा चेहरा असून देशातील कटुता आणि द्वेषाला मूठ माती देण्यासाठी ही भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्यानंतर बुलढाण्यात राहुल गांधी (Rahul gandhi) हे दुसरे गांधी येत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक रिंगण (Ringan) सोहळा आयोजित केला होता.


तसेच बुलढाणा जिल्ह्यातून ही यात्रा मध्य प्रदेशाकडे (Madhya pradesh) जाताना हजारो दिव्यांच्या माध्यमातून लाईट ऑफ युनिटी (Light of Unity) स्तंभ उभा करण्यात येणार आहे. जो स्तंभ राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेची साक्ष देत राहील, अशी माहिती माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली.

Full View

Tags:    

Similar News