सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जात आहे. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने अजबचं नाद केलाय. तब्बल दीड एकर शेतामध्ये, 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी जवळपास 50 एक्करवर शेती बागायती होऊ शकते. पाहुयात दुष्काळी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्वांत मोठी विहीर म्हणून नोंद ठरु शकणाऱ्या, नाद खुळ्या " शेतकऱ्याची कशी आहे ती विहीर ? या विषयीचा हरीदास तावरेंचा मॅक्स महाराष्ट्रासाठीचा स्पेशल रिपोर्ट....