लसीकरणानंतरही कोरोना होता का? – डॉ. संग्राम पाटील

सध्या देशात कोरोना लसीकरण सुरु आहे. मात्र, कोरोनाची लस घेतल्यानंतर काही लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आलं आहे. ही बाब चिंतेची आहे की नाही, तसेच लस का घेतली पाहिजे याचे विश्लेषण डॉ. संग्राम पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली आहे.....;

Update: 2021-03-19 14:22 GMT

लंडन येथील प्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील सांगतात... कोरोनाची लस प्रभावी आहे. मात्र, त्यात आपल्या देशात लसीचं प्रमाण किती आहे? याचा विचार करायला हवा. आपल्या देशात पहिला डोस दिला गेला आहे. पहिला डोस घेतल्यास 76 टक्के प्रॉटेक्शन राहते. दुसरा डोस घेतल्यास इतकंच प्रॉटेक्शन राहतं. तीन आठवड्यानंतर साधारण आपल्याकडे दुसरा डोस घेतात. मात्र, दोन डोसमध्ये दोन महिने तीन महिन्याचं अंतर ठेवलं तर 80 टक्के प्रोटेक्शन राहते.

कोरोनाची लस घेतली तरीही कोरोना का होतो?

यावर संग्राम पाटील सांगतात... कोणत्याही लसीने साधारणपणे 100 टक्के लोक संरक्षित होत नाही. काही लोक संरक्षित होण्याचे राहतात. मात्र, कोरोनाची लस घेतली असता, तुम्हाला कोरोनापासून होणारा धोका कमी होतो. मृत्यूचं प्रमाण ही लस घेतल्यास जवळ जवळ नगण्य आहे.

कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवणं गरजेचं...

संग्राम पाटील सांगतात, व्हायरसचं स्वरुप बदलतंय का? यावर सरकारने लक्ष द्यायला हवं त्याचबरोबर सरकारने लसीकरण वाढवावं, जास्तीत जास्त लोकांनी लस दिली तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो.

कोरोना आणि कोरोनाच्या लाटी...

कोरोनाच्या साधारण तीन लाट येतील. 100 वर्षापुर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूमध्ये सेकंड व्हेव ही मोठी होती. त्यामुळं दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. युरोप आणि अमेरिकेत देखील हीच परिस्थिती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत मृत्यू दर कमी आहे. असं मत संग्राम पाटील यांनी व्यक्त केलं आहे. काय म्हटलंय संग्राम पाटील...



Full View
Tags:    

Similar News