विक्रम गोखले : स्वातंत्र्याबाबत कंगनाच्या दाव्याचे कागदोपत्री पुरावे

एकीकडे पंतप्रधान मोदींनी देशभरात स्वातंत्र्याचे ७५ वे वर्षे जोरात साजरे करण्याचे आवाहन केले आहे. पण आजही देशातील काही जणांना २०१४ लाच स्वातंत्र्य मिळालं असं वाटतंय.

Update: 2022-08-14 13:32 GMT

कंगना रानावत हिने भारताला भिकेत स्वातंत्र्य मिळाले आणि मे २०१४मध्ये भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असे वक्तव्य केले होते. तिच्या वक्तव्याचे समर्थन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. पण आता मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांना दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीमध्ये विक्रम गोखले यांनी कंगनाबाबत आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा दावा केला आहे. भिकेत स्वातंत्र्य मिळाले या कंगनाच्या वक्तव्याचे आपण समर्थन केले नाही, पण तिने सांगितले ते सत्यच आहे, त्यासाठी माझा काही राजकीय अभ्यास आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. जगाच्या इतिहासात ब्रिटीश साम्राज्य १८ मे २०१४ रोजी संपले....तोपर्यंत ब्रिटीश साम्राज्यच होते, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.


Full View

Tags:    

Similar News