ठाणे - कोरोनाच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यात सर्वाधिक फटका बसलेला वर्ग म्हणजे घर कामगार महिला....हातचा रोजगार गेला, उपासमारीचे संकट ओढवले. या संकटात राज्य सरकारने घरेलू कामगार, व रिक्षाचालक यांना मदतीचा हात देऊ केला. पण या सरकारी मदतीचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती, ती कुठे द्यायची, त्याची प्रक्रिया काय? याची माहितीच या लोकांना नव्हती. अनेक घरेलू कामगार महिला अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या आहेत. मात्र या महिलांसाठी मुंब्रा- रेतीबंदर येथील युवती कार्यकर्ता श्रुती बापू चौकसे हिने पुढाकार घेतला आहे. सरकारी मदत मिळवून देण्यासाठी ती सर्व कागदपत्रे जमा करून अनुदानाचा लाभ मिळवून देण्याचे काम करीत आहे. तिचा या कार्याची माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...