दत्तात्रय लोहार यांना आनंद महिंद्रा महिंद्रानी दिली बोलेरो भेट...
दत्तात्रय लोहार यांना आनंद महिंद्रा महिंद्रानी दिली बोलेरो भेट...;
जुगाड जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहार देशभर चर्चेत आलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोहार कामातील पारंपरिक कौशल्याचा वापर करत त्यांनी जिप्सी बनवली होती. या गाडीचे साहित्य जमवण्यासाठी त्यांना दोन वर्षे वाट पहावी लागली होती. अखेर कुटुंबियांच्या मदतीने त्यांनी आपली गाडी साकारली होती. हि गाडी घेऊन त्यांनी पंढरपूर पर्यंतचा प्रवास केला. या दरम्यान या गाडीचा व्हिडिओ वायरल झाला होता. या व्हिडिओची आणि त्यांच्या या कामाची दखल घेत आनंद महिंद्रा यांनी त्यांना बोलेरो गाडी देण्याची ऑफर दिली होती. महिंद्रा यांनी दिलेला शब्द पूर्ण करत अखेर त्यांना आज बोलेरो गाडी भेट देण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या हस्ते लोहार कुटुंबीयांना नव्या गाडीची चावी देण्यात आली. सहकुटुंब उपस्थित राहत दत्तात्रय लोहार यांनी हि गाडी स्वीकारली. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
१.माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या हस्ते लोहार कुटुंबीयांना नव्या गाडीची चावी देण्यात आली
२.कामाची दखल घेत आनंद महिंद्रा यांनी त्यांना बोलेरो गाडी देण्याची ऑफर दिली होती