सोशल मीडियावरचा संगणक अभियंता निघाला 'वायरमन'
सोशल मीडियाच्या काळामध्ये काय खरं आणि काय खोटं लवकर कळायला मार्ग नसतो. UPI चे बारकोड एटीएम प्रमोट करत बनलेल्या रवीसुतनाजानी कुमार बोगस संगणक अभियंता निघाला असून पर्दाफाश झाल्यानंतर ट्विटर आणि लिंकडेन अकाउंट डिलीट करून तो आता गायब झाला आहे.;
FinTech असल्याचा दावा करत X वापरकर्ता
रवीसुतनाजानी कुमार नुकतंच मुंबईत झालेल्या फिनटेक महोत्सवामध्ये यूपीआय एटीएम मधून पैसे काढत असताना वायरल झाला होता.
सोशल मीडियावर अनेकांना धक्का बसला कारण X अकाउंट सतर्कआदमी ( #WearMaskSaveLives) याने थ्रेड प्रसिद्ध करत कोण आहे रवीसुतनाजानी? असा त्याच्या बोगसगिरीचा भांडाफोड केला आहे.
हा भांडाफोड झाल्यानंतर रवीसुतनाजानी याने त्याचे फिटर आणि लिकडेन अकाउंट डिलीट करून पळ काढला आहे.
रवीसुतनाजानी डिग्री नसताना बोगसगिरी करणे हा केवळ एक गुन्हा नाही तर कामाच्या ठिकाणी फोर्ड केल्याबद्दल काही महिन्यापूर्वी त्याला कामावरून काढण्यात आलं असं एका एक्स वापर कर्त्यानं म्हटलं आहे.
Xअकाउंट सतर्कआदमी (#WearMaskSaveLives) तपासणी मध्ये
रवीसुतनाजानी IIT अलाहाबादचा संगणक अभियंता नसल्याचे सिद्ध झाले रवीसुतनाजानी याने शासकीय ITI मिर्झापूर मध्ये वायरमन चा ट्रेड केल्याचे सिद्ध झाले.
एकंदरीतच या प्रकरणावरून आभासी दुनिया मध्ये अनेक बोगस लोक वावरत असून खोट्या पदव्या आणि चेहरे घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया वापरताना स्वतःच्या जबाबदारीवर सजगपणे याचा वापर करावा असं मॅक्स महाराष्ट्राचं म्हणणं आहे.