lunar gravity -चंद्रयान-३ चा व्हिडीओ आला समोर ; गुरुत्वाकर्षणाबाबत माहिती
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची चांद्रयान-3 मोहीमचं लॉन्चिंग 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा च्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या करण्यात आलं. ५ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रोने चांद्रयान-३ (ISRO Chandrayaan-3) ने चंद्राची पहिली छायाचित्रे टिपलेली आहेत. शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतरची 40 सेकंदाची क्लिप प्रसिध्द करण्यात आलीय. चंद्राच्या तपशीलांची झलक या क्लिपमधून दिसत आहे. चांद्रयान- 3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्त्रो ने दिलीय.
इस्त्रो ने यासंदर्भातील माहिती ट्विटरद्वारे दिलीय. ते म्हणाले की, ‘मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत आहे’ हा चांद्रयान-३ चा संदेश इस्रोला चंद्राच्या जवळ पोहोचवणारा मोठा टप्पा गाठल्यानंतर मिळाला होता. चांद्र मोहीम आतापर्यंत सुरळीत चाललीय. इस्रोला अपेक्षा आहे की, विक्रम लँडर (Vikram lander) या महिन्याच्या शेवटी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.
येत्या रविवारी (१३ ऑगस्ट) पुढील ऑपरेशनची कक्षा कमी करण्यात येईल, असंही इस्त्रोनं जाहीर केलंय. तर 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान चांद्रयान-3 ची कक्षा आणखी कमी करण्यासाठी पुढील ऑपरेशन करणार असल्याचे इस्रोनं स्पष्ट केलंय.