ChatGPT देणार Google ला टक्कर

तुमच्या मनात प्रत्येक क्षणाला अनेक प्रश्न येत असतात. मात्र आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक सेकंदात मिळणार असं कुणी म्हणाल्यास तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. पण ChatGPT या अॅपवर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक सेकंदात मिळणार आहे. पण हे चॅट जीपीटी काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2023-02-13 07:19 GMT

सध्याच्या काळात जगभरात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय तो ChatGPT हे अॅप. हे अॅप खूप चर्चेत आहे. चॅट जीपीटीचे इंग्रजी भाषेतील संपूर्ण नाव "चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर" (Chat generative printed) असे आहे. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Open Artificial Intelligence) या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान एक प्रकारचे चॅट बॉट (Chat bot) आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. मस्क आणि चॅटजीपीटीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन (Sam altman) यांनी या कंपनीची स्थापना केली आहे.

ChatGPT हे अॅप ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लाँच करण्यात आले होते. याचे अधिकृत संकेतस्थळ हे Chat.openai.com असे आहे. चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धीमत्ता साधन असून काहीजण याला दुसरे गुगल (Google) सर्च इंजिन सुद्धा म्हणतात. आपल्याला जगभरातील एखादी माहिती हवी असेल तर आपण गुगलवर सर्च करतो. तसेच आता जगभरातील लोक या बॉटला प्रश्न विचारुन आपल्या प्रश्नाचे उत्तर काही सेकंदात मिळवू शकतात. एखादा प्रश्न या बॉटला विचारता क्षणी एक सेकंदात आपल्या प्रश्नाचे उत्तर हा बॉट देतो. चॅट जीपीटीचा नागरिक एक प्रकारे शोध इंजिन म्हणून सुद्धा विचार करु शकतात.

चॅट जीपीटी सध्या केवळ इंग्रजी भाषेत वापरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. मात्र आगामी काळात चॅट जीपीटीवर विविध भाषेतून माहिती उपलब्ध होवू शकते. तशी तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. चॅट जीपीटीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, जेव्हा एखादा याचा वापर करतो आणि तो कोणतीही माहिती यावर शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला त्याची माहिती संपूर्ण तपशीलासह मिळते. म्हणजेच त्याला त्यांच्या प्रश्नांची संपूर्ण माहिती तपशीलवारपणे मिळते. हे अॅप ओपन एआयने कुठलेही मुल्य न घेता जीपीटीने फ्रीमध्ये ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहे. चॅट जीपीटीने जानेवारीमध्ये १०० मिलियन युजर्सचा टप्पा गाठला आहे.

 

Tags:    

Similar News