चंद्रयान-३ चा अखेरच्या 18 मिनिटांचा थरार, Algorithm कसं करणार काम?
रशियाचं लुना-२५ हे यान चंद्रावर उतरण्यापुर्वीच क्रॅश झालं. मात्र आता जगाचं लक्ष भारताच्या चंद्रयान-३ कडे लागले आहे. हे यान बुधवारी लँड होणार आहे. पण लँडिंग होताना त्याचे अल्गोरिदम कसं असेल? हे सोप्या भाषेत समजून घेऊया....;
भारताचं महत्वाकांक्षी चंद्रयान-३ चंद्राच्या अत्यंत जवळ पोहचले आहे. या यानाचा बुधवारी सायं. 5.45 पासून 18 मिनिटांचा थरार जगभरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. त्यातील अत्यंत कठीण टप्पे पुढीलप्रमाणे असतील.
5.45 पासून हा थरार सुरू होणार असला तरी त्यातील पहिली फेज 5.47 मिनिटांनी सुरू होणार आहे.
१) रफ ब्रेकिंग फेज : 25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चंद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल आणि त्याच वेळी लँडिंग साईटकडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .
2.Atitude Holding फेज
"Atitude" not "Altitude". जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल. तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Horizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.
3.Fine ब्रेकिंग फेज
175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का? खड्डे आहेत का? हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.
4.टर्मिनल डिसेंट फेज
हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल. यानंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल. Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल.
5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे. त्यामुळे ही माहिम फत्ते होईलच, याविषयी इस्त्रोचे शास्रज्ञांना प्रचंड आत्मविश्वास आहे.
चंद्रयान-३ सायंकाळी 5.45 ते 6.04 या वेळेत हा थरार देशवासींना पहायला मिळणार आहे. या चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण मॅक्स महाराष्ट्रवर दाखवण्यात येईल. त्याबरोबरच Isro च्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपण हे चंद्रयान पाहू शकतो.