मोबाईल चार्जरने लुटले १६ लाख रुपये

Update: 2022-09-19 04:19 GMT

आजकाल प्रत्येकाला बँकेकडून कोणतंही तपशील अनोळख्या व्यक्तीला शेअर न करण्याचं आवाहन केलं जातं. पण जर आपण कोणत्याही लिंक वर क्लिक करत नसाल, तपशील शेअर करत नसाल आणि तरी सुध्दा आपल्या बॅंक खात्यातून लाखो रूपयांची चोरी झाली असेल तर... हो अशी चोरी झाली आहे. सायबर लुटीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.  हैद्राबाद मध्ये एका मोठ्या कंपनीच्या CEO सोबत ही घटना घडली आहे. अभिजीत वाघमारे या हॅकर ने ही केस सोडवली आणि सगळ्यांसोबत शेअर देखील केली आहे.

एका मोठ्या कंपनीचा CEOमाझ्या मित्राचा boss आहे त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये ऑनलाईन चोरी झाले कुठलाच OTP Call नव्हता ,कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही किंवा ओपन केली गेली नाही त्याचा boss स्वतः अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी सायबर क्राईमचे एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत....

मोबाईल मधुन सगळी स्कॅनिंग स्क्रूटणी झाली कुठलाच ट्रेस मिळाला नाही तेव्हा फक्त एक क्लू मला मिळाला. त्याच्या ऑफिसमधला CCTV फुटेजवरून तिथं क्लू मिळाला.

तर त्या CEO चा मोबाईलचा चार्जर हा बदलला गेला.ऑफिसमधेच आणी त्याच्या ठिकाणी दुसरा USB चार्जर ठेऊन त्याचा सगळा डेटा हा कॉपी केला गेला त्याची अख्खी मोबाईल बँकिंग हॅक केली गेली आणी अकाउंट मधुन पैसे काढले गेले.

तर ह्या modus oprendy मध्ये आधी चार्जर रिप्लेस केला जातो व त्या चार्जर मध्ये एक आधीच एक मायक्रो चिप बसवलेली असते त्यात सगळा डेटा कॉपी केला जातो आणी hacking होते आणी हा अतिशय न समजून येणारा प्रकार आहे आणी माझ्या नॉलेज मध्ये हा पहिलाच प्रकार आहे hacking मधला त्यामुळे इथून पुढे चार्जर्स आणी USB कॉड वर विशेष लक्ष ठेवा कोणाचे ही वापरू नका किंवा आपला मोबाईल unknown ठिकाणी chargeing ला लावू नका.

Tags:    

Similar News