Twitter CEO : एलन मस्क देणार ट्विटरचा राजीनामा

Elon Musk Resign : ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना CEO पदावरून हवटले होते. त्यानंतर एलन मस्क हे ट्विटरचे CEO बनले होते. मात्र सहा महिन्यातच एलन मस्क यांनी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे.;

Update: 2023-05-12 03:14 GMT

Twitter New CEO : एलन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीनंतर अनेक मोठे निर्णय घेतले होते. त्यातच ट्विटरचे तत्कालिन CEO पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनाही ट्विटरच्या CEO पदावरून हटवले होते. त्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरच्या CEO पदाची धुरा हाती घेतली होती. मात्र आता एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देत नव्या सीईओची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे.

एलन मस्क यांनी ट्वीट (Elon Musk Tweet) करून म्हटले आहे की, मी नव्या ट्विटरच्या सीईओची घोषणा करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या सहा आठवड्यात मी नव्या सीईओची घोषणा करणार आहे. नव्या सीईओ म्हणून महिलेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर माझी भूमिका ही कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल, असंही एलन मस्क यांनी सांगितलं.



एलन मस्क यानी ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्क यांनी कंपनीत मोठे बदल करत 7 हजार 500 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मस्क यांनी ब्लू टिकसाठीही पैसे द्यावे लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार सध्या ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागत आहेत. याबरोबरच आता यापुढे ट्विटरवर लेख वाचण्यासाठीही पैसे मोजावे लागणार असल्याचे संकेत मस्क यांनी दिले आहेत.



Tags:    

Similar News