World Health Day: भौगोलिक परिस्थिती आणि मानवी आरोग्याचा काय संबंध ?
उन्हाळा लागला की कोरोना कमी होईल. असा अंदाज लोक वर्तवत होते. मात्र, खरंच भौगोलिक गोष्टींचा मानवी जीवनाशी काही संबंध आहे का? पृथ्वीचा भूगोल काय सांगतो? करोना सारखे जीवघेणे विषाणू कसे पसरत आहे? जाणून घ्या Adv गिरिश राऊत यांच्याकडून..;
गिरिश राऊत सांगतात की…
पृथ्वीवरील बदलणारे हवामान, तापमान आणि भूगोल यांचा मानवी जीवनाशी फार जवळचा संबंध आहे. आपण सर्वांनी भौगोलिक बदलांकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात भूगोल विषयात महासागरांचा अभ्यास चुकीच्या पद्धतीने शिकवला जातो. मानवाने भूगोलाशी केलेला खेळ हा पृथ्वीची अधोगतीकडे वाटचाल असल्याचं दर्शवतो.
तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत आहे. दक्षिण ध्रुवावर, अंटार्कटिका खंडावर 3 ते 6 किलोमीटर जाडीचा थर आहे. भारतापेक्षा अनेक पटीने त्याचा आकारमान आहे. आणि हा बर्फ झपाट्याने वितळतोय. यामुळे भू कवचावरील वजन असंतुलित होतंय. याचा संपूर्ण परिणाम भू कवच्यावरच्या रचनेवर होतोय. अर्थातच ज्वालामुखी, भूकंपाच्या उद्रेकावरही होतोय. या सगळ्यांचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. वेगाने बदलणारे हवामान मानवी आरोग्य धोक्यात आणत आहे. वेगवेगळे विषाणू पसरण्यामागे पृथ्वीवरील डोंगर, जंगलतोडीशी संबंधित आहे.
आफ्रिका, आशिया, अमेरिकेतील जंगल ही अस्पर्श होती. ही जंगल तोड वाढल्यामुळे विषाणू बाहेर पडले असून मानवी जीवनावर ते हल्ला करत आहे. करोना सारखे अनेक विषाणू सतत येऊ शकतात. पृथ्वीच्या या भौगोलिक परिस्थितीशी मानवी आरोग्य पूर्णपणे जोडलं गेलं असून आता ते उच्चाटनाच्या स्थितीत गेलं आहे.
ध्रुवांवरील बर्फ वितळ्यामुळे लाखोवर्षांपूर्वीचे जे जीवाणू होते ते सक्रीय होऊन बाहेर पडत आहे. आपण ज्याला प्रगती मानतो जे स्वयंचलित यंत्र येणं, वीजनिर्मिती, सिमेंट निर्मिती, टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज एसीसारख्या गोष्टी या पृथ्वीच्या पूर्ण रचनेला तोडूनच निर्माण होत आहे. हा कायमस्वरुपी बदल घडवून निर्माण होतयं आणि हे आपल्याला मानवी आरोग्याला घातकच आहे.
Full View