ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण येणार - प्रकाश जावडेकर

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कामकाजाच्या संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. त्यामुळे ओटीटी माध्यमांवर काहीही प्रसारित करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालायाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Update: 2021-01-31 08:47 GMT

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही मालिकांबद्दल बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या असून आता या माध्यमांच्या कामकाजाच्या संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

आम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही मालिकांबद्दल बर्‍याच आम्हाला बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि डिजिटल वर्तमानपात्रातून प्रसिद्ध झालेले चित्रपट व मालिका प्रेस कौन्सिल ऍक्ट, केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) ऍक्टव सेन्सॉर बोर्डच्या कक्षेत येत नाहीत. त्यांच्या कामकाजाच्या संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार आल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हंटले आहे.

या माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या मालिका व चित्रपटांना सेन्सॉरशिप लागू होत नव्हती. त्यामुळे या माध्यमांवर कोणतंही बंधन नाही व त्यामुळे अनेक चित्रपट निर्माते या माध्यमांवर आपले चित्रपट प्रसारित करत असत. या माध्यमांवर प्रसारित झालेल्या अनेक मालिका व चित्रपट वादग्रस्त ठरले होते. आता मात्र नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ यासह अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या मालिका व चित्रपटांना सेन्सॉरशिप असेल त्यामुळे आता ओटीटी माध्यमांवर काहीही प्रसारित करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालायाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Tags:    

Similar News