डेटिंग ॲप म्हणजे प्रेमाचे व्यापारीकरण !

डेटिंग ॲप्स हा एक धोका आहे का? हे ॲप्स कसं काम करतात? डेटिंग ॲप्स तुमची Personal Information वेगवेगळ्या कंपन्यांना विकून किती पैसा कमावतात? डेटिंग शब्द कसा सुरु झाला? त्याचा अर्थ बदलत्या काळानुसार कसा बदलत गेला? जाणून घेण्यासाठी वाचा सई मनोज यांचा लेख...

Update: 2024-07-02 07:35 GMT

अगदीच typical बायकी मानसिकतेने बोलायला गेलच तर “आमच्या काळात“ नव्हत बुवा हे डेटिंग ॲप वगैरे. आम्हांला आमच पहिलं प्रेम घराजवळ, क्लासमध्ये किंवा शाळा काॅलेजमध्ये मिळायच. पहिलं प्रेमच शेवटच,म्हणजे पहिल्या प्रेमालाच लग्नाचं लेबल लागायची शक्यताही जास्त असायची. कधी कधी जात,धर्म, आर्थिक स्तर या गोष्टींमुळे कुटुंबाच्या दबावातून काही प्रेमकहाण्या अपूर्णच राहून जायच्या. तर कधी नकोच बाबा असली झंझट काही, म्हणून प्रेम या बाजूला न बघणारेही कमी नव्हते. या कॅटगरीत मुली जास्त असत. तर काही जण एक गेली/ गेला की लगेच दुसऱ्या / दुसरीवर छापे टाकायला चालू करणारेही असत…

पण “ डेटिंग” हा शब्द तितकासा प्रचलित नव्हता. मी अगदी माझ्या प्रियकराबरोबर, म्हणजेच आत्ताच्या नवऱ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना माझ्याहून ४-५ वर्षांनी लहान मुलाने मला “तू डेट वर जातेस का” असं विचारल्यावर “नाही रे, म्हणजे काय?” असा बाळबोध प्रश्न विचारण्याइतपत मी अजाण होते या “ डेटिंग” शब्दाबाबत. पण हल्ली म्हणे बरेच डेटिंग ॲप्स असतात आणि त्यावर आपला “ मॅच” मिळाला की ते दोघेजण एकमेकांना डेट करतात, म्हणजेच भेटतात. मग कधी हे डेटिंग फारच “casual” असत, तर कधी “Serious typs”, long term विचार करणारं. काही डेटिंग्स फक्त physical attraction मध्यून घडतात, तर काहीजण लग्न जुळवण्यासाठीही या डेटिंग ॲपची मदत घेतात.

पण सोशल मिडियावर वावरताना प्रचंड काळजी घ्यावी लागते, या ॲप्सच्या बाबतीतही काही वेगळं नाहीये. “कोणीतरी स्पेशल” भेटेल या आशेने तुम्ही हे अॅप वारंवार वापरू लागता. या ॲप्सची swipe left, swipe right स्ट्रॅटेजी तुम्हांला या ॲप्स वर गुंतवून ठेवते. तिथल्या कोणी तरी मनाला भावलेल्या व्यक्तीने मेसेज केला, किंवा त्या व्यक्तीबरोबर तुमचं चॅटिंग झालं की तुमच्या मेंदूमध्ये डोपामाईन हे happy harmone स्त्रवतं. जे तुम्हांला सुखकर अनुभूती देत. आणि वारंवार स्त्रवणारं हे डोपामाईन तुम्हांला या डेटिंग ॲप्सच व्यसन लावत.

पण बास, या डेटिंग ॲप्सच हा एकच धोका आहे का? तर नाही..!! तुम्ही या ॲप्सवर चॅटिंग करताना समोरच्या मनपसंत व्यक्तीला तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्याबद्दल जी जी माहिती देता,ती माहिती हे ॲप्स वेगवेगळ्या कंपन्यांना विकत आणि तुमच्या खूप जास्त personal information वर हे ॲप पैसे कमावत. लोकांची sexuality, आजार इतकी नाजूक माहितीही हे ॲप्स वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवतात.

मुळात हे ॲप्स काम कसं करतात? एकाच व्यक्तीबरोबर डेटिंग झालं की तुम्हांला तुमच आयुष्यभराच प्रेम मिळावं असा या ॲप्सचा हेतू असतो का? अहो असं झालं तर हे ॲप्स चालणार कसे? तर secret is की हे जे ॲप तुम्हांला तुमचा “मॅच” शोधून देण्याचा दावा करतात, खरं तर तो तुमचा खरा “मॅच “नसतोच. तुम्ही त्या व्यक्तीला भेटावं, न पटल्याने तुम्ही वेगळं व्हावं आणि रिकाम्या आणि दु:खी मनाने तुम्ही परत या ॲप्सवर नव्या प्रेमाच्या शोधात swipe left,swipe right करत रहाव असा या ॲप्सचा हेतू असतो. तुम्ही जितका वेळ या ॲप्समध्ये गुंतून पडाल तितकाच पैसा तर हे डेटिंग ॲप्स कमावतील नाही का?

Its business you know..

तर सगळं असय. नेक्स्ट टाईम हे असे ॲप्स वापरताना आणि आपली वैयक्तिक माहिती समोरच्या बरोबर शेअर करताना चोरून चोरून कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे एवढं नक्की लक्षात असूद्यात…

Tags:    

Similar News