अस्वलाचा अनोखा व्हिडीओ होतोय व्हायरल; माणसाकडून संगीत प्रशिक्षण घेतोय
सोशल मिडीयावर सध्या एका अस्वलाचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एक अस्वल चक्क हार्मोनिका वाजवण्याचे प्रसिक्षण घेताना दिसून येत आहे.;
आपण सोशल मिडीयावर नेहमीच कुतूहल निर्माण करणारे वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओ पाहत असतो. काही व्हिडीओ अगदीच मजेशीर तर काही व्हिडीओ माणसाला भावूक करणारे असतात आणि काही व्हिडीओ तर चक्क आपल्याला थक्क करणारे किंवा भारावून टाकणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल चक्क माणसाकडून हार्मोनिअम वाजवण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
अस्वलाबरोबर असलेली माणसाची ही खास मैत्री तुम्ही पाहिलात का? या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव अस्वलाला चक्क हार्मोनिअम वाजवायला शिकवत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडीओ रशिया या देशातला आहे.