तीनशेपेक्षा जास्त चित्रपटांत काम करणारे भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
थरथराट, खतरनाक, सोंगाड्या, मुंबईचा जावई यासारख्या 300 पेक्षा अधिक चित्रपटात काम करणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले.;
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (senior Actor Bhalchandra Kulkarni) यांचे आज कोल्हापुरमध्ये (Kolhapur) निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या अभिनयाच्या जोरावर भालचंद्र कुलकर्णी यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपली छाप सोडली. (Bhalchandra Kulkarni passes Away)
भालचंद्र कुलकर्णी यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये (Marathi Film) काम केले. त्यामधील असला नवरा नको गं बाई, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक, पिंजरा या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांना त्यांच्या सहायक भुमिकांसाठी ओळखले जाते. त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांमध्ये भुमिका साकारल्या होत्या. त्याबरोबरच त्यांचा अनेक पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. त्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रभुषण पुरस्काराने (Chitrabhushan Award) सन्मानित केले होते. त्यांनी जयप्रभा स्टुडिओ आणि शालिनी स्टुडिओचे जतन व्हावे, यासाठी उभारलेल्या लढ्यात अग्रभागी भुमिका निभावली होती. त्यांनी काही वर्षे शिक्षक म्हणूनही काम केले होते.