द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये भारतीय चित्रपटांनी आपली छाप सोडलीय. हा देखणा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी असलेल्या मेलबर्नमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यात भारतीय चित्रपटांबरोबच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरीज् ने देखील आपला ठसा उमटवलाय.
मेलबर्न इथल्या प्रसिद्ध हॅमर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. यात चित्रपट निर्माते, कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये मागील वर्षातील दर्जेदार चित्रपटांवरही फेस्टिवलमध्ये प्रकाश टाकण्यात आला. शिवाय भारतीय चित्रपटांचा उंचावलेला दर्जा याचीही फेस्टिवलमध्ये दखल घेण्यात आली. अभिनेत्री राणी मुखर्जी आणि मोहित अग्रवाल यांना मिस्टर चॅटर्जी Vs नॉर्वे या चित्रपटासाठी अभिनयाचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. तर सीता रामम् या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय. इंडी चित्रपटाच्या श्रेणीत आग्रा या चित्रपटाला तर कन्नड चित्रपट निर्माते पृथ्वी कोनानूर यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय.
पुरस्कार्थींची यादी खालीलप्रमाणे
ज्युरी अवॉर्डस्
सर्वोत्तम माहितीपट
To Kill A Tiger
सर्वोत्तम इंडी चित्रपट
Agra
सर्वोत्तम अभिनय (पुरूष)
Mohit Agarwal for Agra
सर्वोत्तम अभिनय (स्त्री)
Rani Mukerji for Mrs Chatterjee Vs Norway
सर्वोत्तम दिग्दर्शक
Prithvi Konanur - Hadinelentu (Seventeeners)
सर्वोत्तम चित्रपट
Sita Ramam
सर्वोत्तम अभिनय OTT सीरीज (पुरूष)
Vijay Varma for Dahaad
सर्वोत्तम अभिनय OTT सीरीज (स्त्री)
Rajshri Deshpande for Trial By Fire
सर्वोत्तम OTT सीरीज
Jubilee
सर्वोत्तम लघुपट – प्रेक्षकांमधून निवडलेला
Connection Kya Hain by Nilesh Naik
सर्वोत्तम लघुपट - ऑस्ट्रेलिया
Home by Mark Russel Bernard
मानाचे पुरस्कार
चित्रपटातील समानता पुरस्कार – चित्रपट - डार्लिंग्ज
पिपल्स चॉईस अवॉर्ड – चित्रपट – पठाण
चित्रपट निर्मितीला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळं करण जोहरला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
Rising Global Superstar of Indian Cinema – कार्तिक आर्यन
Diversity in Cinema Award - Mrunal Thakur
Disruptor Award - Bhumi Pednekar
Rainbow Stories Award to Onir for Pine Cone