'पद्मावत' सिनेमाचा 24 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो 'फायटर'

सुपरस्टार हृतिक रोशनचा चा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक रोशनचा या चित्रपटात नेहमी सारख्या त्याच्या अक्शन मोड मध्ये दिसणार आहे.;

Update: 2024-01-24 09:34 GMT

सुपरस्टार हृतिक रोशनचा चा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक रोशनचा या चित्रपटात नेहमी सारख्या त्याच्या अॅक्शन मोड मध्ये दिसणार आहे.

देशभरात 'फायटर' (Fighter) हा सिनेमा 7,537 स्क्रीनवर रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत वायकॉम 18 ने केली आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोणसह अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, संजीदा शेखसह अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील लक्षवेधी संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 'फायटर' हा सिनेमा 2024 गाजवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'पद्मावत' सिनेमाचा 24 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो 'फायटर'

20 जानेवारी 2024 पासून या सिनेमाच्या अॅडवांस बुकिंगला सुरुवात झाली असून, सॅकनिल्क एंटरटेनमेंटचा एक रीपोर्ट आला आहे. त्यानुसार, रिलीजच्या दोन दिवसांत 'फायटर'च्या 2.86 कोटी रुपयांच्या तिकीटांची विक्री झाली आहे. देशभरात 7595 शोजच्या अॅडव्हान्स बुकिंगची विक्री झाली आहे. रविवारी रात्रीपर्यंत 87 हजार 163 तिकीट विकले गेले आहेत. हृतिक रोशनच्या चाहत्यांना (Hrithik Roshan) 'फायटर' या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 'फायटर' हा सिनेमा 250 कोटी रुपयात बनवला असून, रिलीजआधी 'फायटर'ने 10-20 कोटींची कमाई केली आहे. तर देशभरात हा सिनेमा रिलीजआधी 25-30 कोटींची कमाई करू शकतो. त्यामुळे हा सिनेमा सहा वर्षांपूर्वी आलेल्या 'पद्मावत' सिनेमाचा 24 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो, असे म्हटले जात आहे.


दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत

'फायटर' या सिनेमात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'फायटर'ने महाराष्ट्रात 75.2 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेलंगनात 40.73 लाख, कर्नाटकात 43.54 लाखांची कमाई केली आहे. 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत

Tags:    

Similar News