Project K चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अमिताभ बच्चन गंभीर जखमी
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना Project K च्या चित्रिकरणादरम्यान गंभीर दुखापत झाला आहे. त्यांच्या बरगड्यांना मार लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमके काय घडले आहे वाचा मॅक्स महाराष्ट्रवर...;
हैद्राबाद येथे प्रोजेक्ट के चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना गंभीर दुखापत झाली आहे. एक अॅक्शन सिनचे चित्रिकरण सुरु असताना ही गंभीर दुखापत झाली असून, त्यानंतर तातडीने चित्रपटाचे चित्रिकरण रद्द करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त पसरताच त्यांच्या चाहत्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमिताभ बच्चन यांनी या संपूर्ण अपघाताची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, प्रोजेक्ट के च्या चित्रिकरणादरम्यान, मला ही दुखापत झाली आहे. हा अपघात एका अॅक्शन शॉटच्या चित्रिकरणादरम्यान झाला. त्यामुळे बरगड्यांना दुखापत झाली आहे. दरम्यान, दुखापतीनंतर चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.
हैद्राबादमधील (Hyderabad) एआयजी रुग्णालयामध्ये (AIG Hospital) अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. त्यांचे सिटी स्कॅन (City Scan) करण्यात आले आहे. चेकअपनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. आणि त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अमिताभ बच्चन या दुखापतीमुळे खूप वेदना होत आहेत. आणि त्यांना हालचाल करताना त्रास होत आहे. तसेच श्वास घेताना सुद्धा त्रास होत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे. या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी अमिताभ बच्चन यांना काही वेळ आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर संपूर्णपणे उपचार करुन त्यांना आराम मिळावा यासाठी काही औषधे आणि पेनकिलर्स दिले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.