मान्सूनपूर्व पावसाने केळीच्या बागा उध्वस्त
अवकाळी पावसामुळे (premonsoon) सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागा काही महिन्यांपूर्वी जमिनीवर कोसळल्या होत्या. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,खर्डी आणि बार्शी तालुक्यातील इरलेवाडी या गावातील बागांचा समावेश होता. याच अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील तोडणीला आलेल्या द्राक्ष बागा (grape)खराब होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असताना मान्सून पूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा,सांगोला,बार्शी,मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील केळीच्या (banana)बागा उध्वस्थ झाल्या आहेत.
मान्सुनपूर्व (premonsoon) सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागा काही महिन्यांपूर्वी जमिनीवर कोसळल्या होत्या. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,खर्डी आणि बार्शी तालुक्यातील इरलेवाडी या गावातील बागांचा समावेश होता. याच अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील तोडणीला आलेल्या द्राक्ष बागा (grape)खराब होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असताना मान्सून पूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा,सांगोला,बार्शी,मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील केळीच्या (banana)बागा उध्वस्थ झाल्या आहेत.
मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे मान्सून पूर्व पावसाच्या तडाक्यात शेतकरी शाहू धनवे यांची दीड एकर केळीची बाग जमीनध्वस्त झाली असून यामध्ये सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या बागेची दोन वेळेस तोडणी झाली होती. येत्या काही दिवसात पूर्ण केळी बाजारात विकण्यासाठी जाणार होती,पण अचानक आलेल्या मान्सून पूर्व पाऊसाने शाहू धनवे यांची बाग जमिनीवर पडल्याने हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून नेहला असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वातावरणीय बदलांचा शेती क्षेत्रावर परिणाम
गेल्या अनेक वर्षांपासून वातावरणात बदल होत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून येत्या काही वर्षात समुद्रातील बेटे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वातावरणीय बदलाचा परिणाम जल,वायू,पृथ्वी यावर होत असून जगासमोर जागतिक तापमान वाढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे बेसुमार निसर्गाची हानी सुरू आहे तर दुसरीकडे निसर्ग वाचवण्यासाठी परिषदांचे आयोजन केले जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून वातावरणीय बदलासंबधी परिषदा होत आहेत,पण त्यांच्या म्हणावा तितका परिणाम होत नाही. असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. त्यासाठी ठोस अशा उपाययोजना कराव्यात असे पर्यावरण प्रेमीना वाटत आहे. या वातावरणीय बदलांचा शेती क्षेत्राला जास्त फटका बसताना दिसत आहे. यामुळे पाऊस अवेळी कोणत्याही ऋतूत पडू लागला आहे. त्यामुळे शेती क्षेत्र अडचणीत येऊ लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याच अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मागील काही महिन्यांपासून नुकसान होत आहे. यामध्ये लाखो रुपयांची पिके वाया गेली आहेत.
अवकाळी पावसाने गेल्या वर्षभरात मोठे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून पावसाच्या तडाक्यात मोहोळ तालुक्यातील येनकी गावात वीज पडून जर्शी गाई मृत्युमुखी पडल्या होत्या. याच अवकाळी पाऊसाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळेवरील आणि घरावरील पत्रे उडून गेले होते तर सांगोला तालुक्यात अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते. याच अवकाळी पाऊसामुळे पंढरपूर तालुक्यातील केळीच्या बागा आणि द्राक्ष बागा जमीनध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागा खराब झाल्या असून या बागांकडे व्यापारी फिरकेना गेले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष जमिनीवर तोडून टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल का नाही याची शास्वती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सिना नद्यांना वर्षभरापूर्वी पुर आला होता,त्यावेळी या नद्याकाठच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नद्यांच्या काठी असणारी अनेक गावे पाण्यामध्ये होती. त्यामुळे अनेकांचे संसार पाण्यामध्ये वाहून गेले होते. त्यावेळी अक्कलकोट तालुक्यात मुख्यमत्र्यांनी येवून शेतकरी आणि गावकऱ्यांना चेकच्या स्वरूपात मदत दिली होती. जिल्ह्यात याच काळात अनेक ठिकाणी पाऊसाने धुवाधार हजेरी लावल्याने शेती पिके पाण्यात वाहून गेली होती. नद्यांना अचानक पूर आल्याने नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्याची जनावरे पाण्यात वाहून गेली होती. अनेक शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या टीमने बोटीतून बाहेर काढले होते. या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला होता. अनेक गावातील वीज गायब झाली होती तर अनेक गावाचे डांबरी रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. अनेकांची दैनिय अवस्था झाली होती. सद्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम शेती आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावर झाला आहे. एकीकडे या पाऊसाच्या पडण्याने आनंद ही साजरा केला जात आहे तर दुसरीकडे काही शेतकरी दुःखी आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या बागा बाद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मान्सून पूर्व पावसामुळे पाच लाख रुपयांचे नुकसान
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी शाहू धनवे यांनी सांगितले,की मान्सून पूर्व पावसाने केळीची बाग जमिनीवर झोपली असून यामध्ये चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बाग लावण्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला होता. आधीच कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे केळी कोठेच विकता आली नाही किंवा पाठवता आली नाही. याच काळात केळीला व्यापारी विकत घ्यायला तयार नव्हते. थोडीफार केळी दोन रुपये किलो दराने विकली होती,पण राहिलेली केळी बागेतच सडून गेली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. पडलेल्या बागेला भाव मिळेल या आशेने आम्ही केळीला खर्च करत होतो. पण अवकाळी किंवा मान्सून पूर्व पावसाने केळीची बाग जमीनध्वस्त झाली आहे. येत्या काही दिवसात या बागेतील केळीची तोडणी होणार होती. या बागेतील एक केळीचा घड 30 ते 35 किलो भरला असता. दीड एकरात 3 हजार केळीची झाडे होती. पावसाने बाग जमिनीवर कोसळल्याने 5 लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाले आहे. जमीनध्वस्त झालेली केळी सध्या मार्केटमध्ये 15 रुपये किलोने विकली गेली असती. महसूल प्रशासनाने या केळीचा पंचनामा केला असून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. असे शेतकरी शाहू धनवे यांनी सांगितले.