#LataMangeshkar:गानकोकीळा लतादीदी अखेर अनंतात विलीन...
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर लतादीदी अनंतात विलीन झाल्या. लतादीदीना शेवटचा निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभर कलाविश्वातून आदरांजली वाहण्यात आली.;
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर लतादीदी अनंतात विलीन झाल्या. लतादीदीना शेवटचा निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभर कलाविश्वातून आदरांजली वाहण्यात आली.
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले होते. विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
केंद्र सरकारचा दोन दिवसाचा दुखवटा आणि राज्यसरकारची उद्या ता.७ रोजी सार्वजिक सुटी तसेच संपूर्ण अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात आलं.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण देखील झाली होती.
नंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.