कोल्हापुरात: वाहतुकीसाठी कोणते रस्ते सुरु आणि कोणते रस्ते बंद राहणार?

Update: 2021-07-24 09:24 GMT

महाराष्ट्रात कोकण सह पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा फटका तेथील वाहतुकीला बसला असून तेथील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे.

महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे महापूर तसेच भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातून वाहणाऱ्या पंचगंगा तसेच कृष्णा नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. कोल्हापूरात पंचगंगा नदीला पूर आलेला आहे. तर सांगलीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी व काणेगाव ही गावे वारणा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील वाहतूक ठप्प झाली असून कोणते रस्ते सध्या वाहतुकीसाठी सुरु आणि बंद आहेत याविषयी कोल्हापूर पोलिसांनी ट्विटर वर माहिती दिली आहे.

हे रस्ते राहणार वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

कोल्हापूर - सांगली रोड वाहतुकीसाठी बंद आहे.

पुणे-बेंगलोर हायवे वाहतुकीसाठी बंद आहे.

कोल्हापूर- रत्नागिरी रोड वाहतुकीसाठी बंद आहे.

कोल्हापूर -गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद आहे.

हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू

तसेच आजरा पोलीस ठाणे हद्दीतील व्हिक्टोरिया पूल येथील हिरण्यकेशी नदीचे पाणी कमी झाल्याने पुलावरील वाहतूक सध्या चालू करण्यात आली आहे .

तर दुसरीकडे कोकणातही महापूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यन्त ७६ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण यात जखमी झाले आहेत. तसेच ३० जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. शिवाय शनिवारी मुख्यमंत्री रायगडमधील महाड च्या पूर परिस्थितीचा आढावा हवाई दौर करून घेणार असून तेथील तळई येथील दुर्घटनाग्रस्त भागला भेट देखील देणार आहेत.

Tags:    

Similar News