अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध काय? नवाब मलिक यांच्या आरोपावर भाजप आक्रमक

Update: 2021-11-07 08:45 GMT

आर्यन खान प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नाही. ड्रग्स पार्टीसंदर्भात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आर्यन खान ज्या ड्रग्ज पार्टीसाठी गेला होता. त्या ड्रग्ज पार्टीत महाविकास आघाडीचे मंत्री अस्लम शेख यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आज नवाब मलिक यांनी दिली..

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात फॅशन टीव्हीचा ब्रँड असलेला पेपर रोल जप्त करण्यात आला आहे. त्या रोलमधून अंमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या ब्रँडचा मालक कासफ खान आहे. मालकाला अटक का झाली नाही? ते वानखेडे यांचे भागीदार असून ते पार्टीत उपस्थित होते. काशिफ खानशी आमचे मंत्री अस्लम शेख यांना पार्टीला येण्यास बळजबरी केली होती. आमच्या सरकारमधील विविध मंत्र्यांच्या मुलांनाही पार्टीला आणण्याचा त्यांचा डाव होता. अस्लम शेख तिथे गेले असते तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र झाला असता.

असा खळबळजनक दावा आज नवाब मलिक यांनी केला आहे.

यावर भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी सवाल उपस्थित करत अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? मलिक यांचे आरोप गंभीर, कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली आहे.

अस्लम शेख यांना काशिफ खान ओळख असल्याशिवाय वारंवार कसे बोलावेल? एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो? असा सवाल करत मोहित कंबोज यांनी अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली आहे. अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे. या सर्व प्रकरणात मी फक्त कोण मंत्री यात आहे? या सवाल केला होता. मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मलिक यांनीच नाव घेतलं आहे.

असं म्हणत मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे.

Tags:    

Similar News