बाजारातील रासायनिक रंगांऐवजी घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग !!!

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतेक सर्वच सार्वजनिक धार्मिक उत्सव आणि सण यावर करोनाची काळी छाया पडलेली दिसतेय. याच पार्श्वभूमीवर होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साधेपणाने साजरी करावी, करोना विषाणूला रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. साधेपणानं साजऱ्या होणाऱ्या सणासाठी नैसर्गिक रंगाची प्रक्रीया सांगितली आहे मोनिका पवार यांनी...

Update: 2021-03-29 06:58 GMT

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण उद्याची रंगपंचमी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता साध्या पद्धतीने सणाचा आनांद लुटणार आहोतचं. त्याआधी धुळवडीसाठी लागणाऱ्या रंगाची तयारी कशी करावी ? बाजारातील रासायनिक रंगांऐवजी घरगुती पद्धतीने नैसर्गिक रंग कसे उपलब्ध होतील ? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर टेंशन घेऊ नका... कारण तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन आलोय.

कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावामुळे बाजारातील रासायनिक रंगांऐवजी तुम्हाला नैसर्गिक रंग तयार करता येऊ शकतात. तेही घरगुती वापरात येणाऱ्या साहित्यांपासून. चला तर या खास टिप्स जाणून घेऊया.

१. हिरवा रंग

सगळ्या गृहिणींच्या घरात सहज उपलब्ध असणारी कडूनिंबाची पानं, मेंदीची पूड किंवा पालक, कोथिंबीर, पुदिना यांच्या वाळवलेल्या पानांची पुड तुम्हाला हिरवा रंग म्हणून वापरता येऊ शकतो. यापैकी कडूनिंबाची पानं चेहऱ्यासाठी गुणकारी तर आहेतचं मात्र, रासायनिक रंगामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना देखील आळा बसायला मदत होते.

२. गुलाल (गुलाबी) रंग

गुलालला चांगला पर्याय म्हणून बीटचा वापर योग्य ठरतो. बीटला पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार होतो. याखेरीज जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा देखील तुम्ही वापर करू शकता.

३. पिवळा रंग

हळद आणि बेसन एकत्र करून कोरड्या पिवळ्या रंगाचा वापर करणं बेस्ट आहे. शिवाय पेस्ट तयार करून धुळवड खेळल्यास त्यातल्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेला फायदा होतो. बेसन पिठाला पर्याय म्हणून तांदळाचं पीठ, मुलतानी मातीचा वापरता होऊ शकतो. पिवळ्या झेंडूची फुले वाळवून बारीक पुड तयार केल्यास पिवळा रंग मिळतो.

४. केसरी रंग

केसरी रंग तयार करण्यासाठी झेंडूची फुले चांगला पर्याय आहेत. याशिवाय पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करता येऊ शकतो. होळीच्या काळात पळसाची फुले भरपूर मिळत असल्याने तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात रंग तयार करता येतो.

५. निळा रंग

निळा जास्वंद आणि जकरांडाच्या फुलांपासून निळ्या रंगाची भुकटी तयार करता येते. गुलाबी कचनार या वनस्पतीच्या फुलापासून आणि बीट पासून निळ्या रंगाचे द्रावण तयार होते.

६. काळा रंग

काळा  तयार करण्यासाठी आवळ्याची फळे रात्रभर भिजवून सकाळी त्यात पाणी टाकल्यास काळा रंग तयार करता येतो. शिवाय काळ्या द्राक्षाच्या रसाचा उपयोग केला तर क्या बात !

चला तर मग धुळवड आणि रंगपंचमी परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत नैसगिक रंगाने खेळुया !!

Tags:    

Similar News