शाळा, महाविद्यालये बंद असल्याचा मुलांच्या मनावर दिर्घकाळ परिणाम राहणार - स्वामिनाथन

शाळा, महाविद्यालये बंद असल्याचा मुलांच्या मनावर दिर्घकाळ परिणाम राहणार असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केलं आहे.;

Update: 2021-08-11 06:20 GMT

नवी दिल्ली // कोरोनाकाळात झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत . अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत, तर शाळा, महाविद्यालये बंद झालेत. त्यामुळे सर्व परिस्थितीचा मानसिक आरोग्यावर देखील परिणाम झाला आहे. आता जरी कोरोनास्थिती सुधारत असली तरी देखील अनेक दिवस शाळा, महाविद्यालये बंद असल्याने लहान मुलांच्या मनावर याचा दिर्घकाळ परिणाम राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

मुलांच्या मानसिक, शारिरीक आणि शिकण्याच्या क्षमतेवर पुढील काही काळासाठी मोठ्या प्रमाणात प्रभाव असणार आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सर्व मोठ्या व्यक्तींच्या लसीकरणासोबतच सर्वच देशांनी शाळा सुरू करण्याला प्राधान्य दिले पाहिजे , असं मत सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केलं आहे. सोबतच त्यांनी सातत्यानं हात धुण्याबद्दल प्रत्येक देशांनी जनजागृती करत भर देण्याचा सल्ला दिला आहे.

शाळा सुरू कराव्यात याबाबत अनेकांनी वारंवार मागणी केली आहे. गरिब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना गेल्या 2 वर्षापासून शिक्षण मिळालेलं नाही. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नाही. त्यामुळे सरकारांनी ऑफलाईन शिक्षण देण्यास भर द्यायला पाहिजे, असं सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं होतं.

भारतात अनेक राज्यांनी आता शाळा सुरू केली आहे. पंजाबमध्ये शाळा सुरू केल्यानंतर काही दिवसातच 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं . त्यातच आता महाराष्ट्रात देखील काही भागात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

Tags:    

Similar News