कल्याण स्थानकावर तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणारा गजाआड

Update: 2021-09-01 07:25 GMT

कल्याण : कल्याण स्थानकावर रात्री 11 वाजण्याचे सुमारास लोकलची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशाने आरडा ओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. निखिल वैरागर असे या आरोपीचं नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबिवली येथे राहणारा तरुण हा 29 ऑगस्ट रोजी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्याजवळ आलेल्या निखिल वैरागर या 21 वर्षीय तरुणाने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत, पैशांची आणि मोबाईलची मागणी केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. मात्र सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला त्यांने आरडा ओरड केल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत निखिलला ताब्यात घेतलं. याबाबत कल्याण जीआरपीत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News