TET exam scam : अश्विन कुमारच्या घरातून 1 कोटीचे दागिणे जप्त

TET पेपर फुटी प्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी अश्विन कुमारला अटक केली होती. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने सापडले होते. याची किंमत तब्बल 1 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.;

Update: 2021-12-27 01:40 GMT

पुणे // TET पेपर फुटी प्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी अश्विन कुमारला अटक केली होती. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने सापडले होते. याची किंमत तब्बल 1 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

तर याच प्रकरणातील तुकाराम सुपेकडेही मोठं घबाड आहे त्यानंतर आज पुन्हा एकदा एका आरोपीकडे कोट्यवधीचे दागिने सापडलेत. पुणे पोलिसांनीजी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला बंगळुरूमधून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी अश्विन कुमारच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी दीड किलो सोन्याचे हिरे रत्नजडित दागिने आणि 27 किलो चांदीचे दागिने सापडले होते. आज या दागिन्यांची किंमत काढण्यात आली. तेव्हा या महागड्या दागिन्यांची किंमत तब्बल 1 कोटींच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले.

दरम्यान, पुणे आरोग्य विभागाच्या गट क पेपर फुटी प्रकरणातील एक एजंट सह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एजंट गायकवाड याच्या सह दोघांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात आरोपी असलेला संजय सानप याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी गायकवाड व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले.

Tags:    

Similar News