मनरो शाळेच्या मैदानातील बांधकाम तात्काळ थांबवा! -खासदार सुनिल मेंढे
मनरो शाळेच्या मैदानातील बांधकाम तात्काळ थांबवा! अशी मागणी खासदार सुनिल मेंढे यांनी केले आहे.या बांधकामामुळे मैदानाचे दोन भाग होत असल्याने या बांधकामाला विरोध होत आहे.;
भंडारा शहरातील इतिहासकालीन असलेले लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयच्या मैदानात भंडारा जिल्हा परिषदेतर्फे बीओटी तत्वावर सुरू असलेले दुकान गाळ्यांचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी आज पत्रकार परिषदेतुन केली आहे.
सदर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना,काही पक्ष,शहरातील नागरीक व शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा विरोध होतांना दिसुन येत असुन आंदोलनही सुरू आहेत त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी खासदार तसेच एक शहरातील नागरीक म्हणुन माझा संपुर्ण पाठींबा असल्याचेही खा.मेंढे यांनी यावेळी सांगितले.
सोबतच या बांधकाम निविदा प्रक्रियेत घोळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या बांधकामामुळे या मैदानाचे दोन भाग होणार असून शाळेच्या वैभवाला त्यामुळे धोका निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिकांचा देखील या बांधकामाला विरोध आहे, त्यामुळे शासन-प्रशासनाने जनभावनेचा आदर करून हे बांधकाम तातडीने थांबावावे, इतर कोणत्याही ठिकाणी बांधकाम करण्यास आमचा विरोध नाही मात्र शाळेच्या मैदानावर सुरू असलेले बांधकाम बंद करावे अन्यथा भाजप च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खा. मेंढे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.