"येस सर" म्हणता म्हणता 'जयश्रीराम' ने रंगला हजेरीपट
हजेरी देताना विद्यार्थ्यांचा जय श्रीरामचा नारा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल .......
हजेरी देताना विद्यार्थ्यांचा जय श्रीरामचा नारा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल .......
अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असतानाच शाळांमध्येही जय श्रीरामचा फिव्हर पाहायला मिळतोय प्राथमिक शाळेतील एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. ज्यात शाळेतील शिक्षक हजेरी घेत असताना विद्यार्थी जय श्रीरामचा नारा देत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ रायगडच्या रोहा तालुक्यातील यशवंतखार इथल्या प्राथमिक शाळेतील असल्याचे सांगितले जात असून स्थानिकांनी याला दुजोरा दिलाय. या चित्रफितीची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिले आहेत.
जबरदस्त ब्रेन वॉश केला जात असल्याचा आरोप
शाळेचे शिक्षक वर्गात attendance घेतात, त्याला विद्यार्थी 'उपस्थित' सर म्हणण्या ऐवजी ' जय श्रीराम ' म्हणताहेत. जबरदस्त ब्रेन वॉश करणे सुरू आहे लहान लहान मुलांचे . यापैकी कुणाचेही मायबाप आले नसतील का यावर आक्षेप घ्यायला ? कुठे नेऊन ठेवनार या पीढ़ी ला ? असे कृत्य माझ्या गावातील शाळेत झाले नाही अजून.आणि असे कृत्य जय श्री राम माझ्या गावच्या शाळेत झाले तर मोठे परिणाम भोगावे लागतील.हे माझी चेतावणी आहे. अशी चेतावणी भंडारा जिल्ह्यातील ओबीसीचे देवानंद भाऊ यांनी दिली आहे.