टीव्ही, चित्रपटसृष्टीमध्ये कलाकरांच्या आत्महत्येच सत्र सुरुचं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या आत्महत्येनंतर आता ‘क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, वो रहने वाली महलो की’ या पॉप्युलर मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता समीर शर्मा याचा मृतदेह राहत्या घरी सापडला आहे. समीरने राहत्या घरी गळफाळ घेऊन आत्महत्या प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याची शंका आहे.
चिंचोली बंदर भागात नेहा बिल्डिंगमध्ये अभिनेता समीर शर्मा राहत होता. समीर फेब्रुवारी महिन्यापासून इथे भाड्याने घर घेऊन एकटा राहत होता. समीरने फोन न उचलल्यामुळे त्याच्या पत्नीने मित्रांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने तपासले असता समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
समीरच्या आत्हत्येचं कारण अद्याप समजले नाही तसेच त्याच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट ही सापडलेली नाही. या प्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करत आहेत. समीरने १४ मालिका आणि हसी तो फसी या सिनेमात काम केलं आहे.