खडसेंचे नाव न घेता गिरीश महाजन यांचा सुडाच्या राजकारणाचा आरोप....

Update: 2020-12-18 14:45 GMT

जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दोन गटांच्या वादात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 29 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संस्थेचे माजी संचालक विजय पाटील यांनी 2018 मध्ये पुणे येथे घडलेल्या घटनेचा हवाला देत निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबत गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्ष सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केलाय, एकनाथ खडसेंचे नाव न घेता ज्यांनी फिर्याद दिली त्यांचा बोलविता धनी दुसरं कोणीतरी आहे असाही महाजन यांनी केला आहे. आरोप केलाय. सत्ता बदलानंतर सुडाचे राजकारण योग्य नाही, असे महाजन यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात गाजत असलेल्या BHR पतसंस्थेच्या प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याचा सर्वच राजकीय पक्षाचा संबंध आहे, आपला एकट्याचा नाही. त्याची चौकशी पोलीस करत आहेत, पण BHR घोटाळ्याशी आपला काही संबंध नाही असा दावाही यावेळी महाजन यांनी केला.

Full View
Tags:    

Similar News