YAVATMAL | शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महागाव पंचायत समितीत भरवली शाळा
महागाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वागद इजारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या 45 असून या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी 15 विद्यार्थी संख्याची पटसंख्या असतानाही दोन-दोन शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त आहे. जिथे गरज असताना शिक्षक नाही याच विधायक मागणीसाठी वागद इजारा येथील पहिली ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवली. या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देत मोर्चा काढून शिक्षकांची मागणी केली आहे.