ताडोबाची राणी माया २०२३ साली अचानक अदृश्य झाली. माया कुठे गेली ? मायाचे पुढे काय झाले ? मायाची शिकार तर झाली नसेल ? असे अनेक प्रश्न आजही माया या वाघिणीच्या प्रेमात असणाऱ्या तिच्या असंख्य चाहत्यांना पडतात. इतका तिचा रुबाब होता. मायाचं बालपण, तिचं अनाथ होणं, तिनं ताडोबा अभयारण्यावर गाजवलेलं अधिराज्य, तिची सर्वदूर पसरलेली लोकप्रियता आणि एकेदिवशी तिचं मनाला चटका लावणारं अदृश्य होणं हे सगळं गोष्टींच्या स्वरूपात सचित्र तुम्हाला वाचायला मिळालं आहे. 'एक होती माया' या अनंत सोनवणे लिखित पुस्तकात.