सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. खासदार गांधी यांनी सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर एकूण स्थितीची माहिती घेतली त्यानंतर सोमनाथ यांच्या हत्येस केवळ पोलिस जबाबदार असल्याचे स्पष्ट असून पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट आहे असे मत राहुल गांधी यांनी मांडले. गांधी यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोप सुद्धा केला.