ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू...
ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू या संत वचन खरं ठरवत अलिबाग येथील अध्यात्मिक प्रवचन देणाऱ्या प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर रेवदंडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
यगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वर्तक आळी, चौल येथे राहणारे व धार्मिक अध्यात्मिक प्रवचन करणारे प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील रेवंदडा पोलिस ठाण्यात पिडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 376, 313,354 504, 506 नुसार बलात्कार, लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवदंडा पोलिस ठाण्यात प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत महिलेने गुन्हा नोंदविला असून नोंदविलेल्या माहितीनुसार प्रमोद दिनानाथ केणे यांनी फसवणूक करून सदर महिलेला मी दत्तभक्त आहे.दत्तांनी मला साक्षात्कार दिला आहे. दत्तानी मला तुला मदत करण्यासाठी पाठविले आहे तूला मी कंपनीत काम देतो असे सांगून दत्ताचे शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले व धार्मिक अध्यात्मिक प्रवचन देणारे प्रमोद दिनानाथ केणे यांनी सदर महिलेची फसवणूक करून गाणगापूर येथून नेले.
त्यांनंतर भाईंदर येथील एका खोलित सदर महिलेला डांबून ठेवले व जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचारामुळे सदर महिलेला दिवस गेले. मात्र प्रमोद दिनानाथ केणे यांनी या महिलेला औषध पाजवून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला . त्यानंतर सदर पीडित महिलेला अलिबाग येथे एका रूममध्ये 3 वर्षे बंदिस्त ठेवण्यात आले.यावेळी सदर महिलेवर सतत 3 वर्षे प्रमोद केणी यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
शारिरीक व मानसिक त्रास दिला, 9 वर्षे कामावर ठेवून घेऊन घरकामाला लावले, विविध कामे सांगितली.4000 रुपये महिना पगार देतो असे सांगितले.9 वर्षाचे महिन्याला 4000 रूपये प्रमाणे एकूण 4,32,000 इतका पगार झाला. परंतू एक रुपयाही प्रमोद केणे यांनी महिलेला दिलेला नाही. तिची आर्थिक फसवणूक सुध्दा झाली.त्यानंतर प्रमोद केणे यांनी शारीरिक मानसिक,आर्थिक शोषण केल्यानंतर तीचा उपयोग केल्यानंतर सदर महिला आजारी पडली. तीचा काहीच उपयोग नसल्याने सदर महिलेला गुजरातमधील गरुडेश्वर येथे दुसऱ्यां मार्फत नेऊन सोडले.झालेला अन्याय सहन न झाल्याने पीडित महिला गरुडेश्वर येथे असलेल्या एका नदीत आत्महत्या करायला गेली.
एका साधूने तिचे प्राण वाचविले. त्या साधुला तीने सर्व हकीगत सांगितले.महिलेच्या अंगावर असलेल्या जखमा बघून त्या साधूने तिला योग्य ठिकाणी नेऊन तिच्यावर उपचार केले. झालेल्या जखमावर उपचार घेऊन सदर महिला बरी झाली. पूर्ण बरी झाल्यास सदर महिलेने रेवदंडा पोलिस स्टेशन गाठत प्रमोद दीनानाथ केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.12 तोळे सोने, साडेतीन लाख रुपये घेउन, पगाराची सुमारे 4,32,000 रूपये न देता व अज्ञानाचा फायदा घेत 1996 ते 2014 या काळात प्रमोद दीनानाथ केणे यांनी इच्छेविरुद्ध वेळोवेळी लैंगिक शोषण करून गर्भपात घडवून आणला. अशी रीतसर तक्रार (FIR )सदर महिलेने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.
रेवदंडा पोलिस ठाण्यात प्रमोद दीनानाथ केणे यांच्या विरोधात दिनांक 20/8/2022 रोजी बलात्कार,मारहाण, धमकी अशा गंभीर गुन्हयांची तक्रार(FIR )दाखल झाली असून सदर प्रकरणी माननीय अलिबाग न्यायालयाने दिनांक 29/8/2022 रोजी अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.सदर प्रकरणातील प्रमोद दीनानाथ केणे हे फरार असून त्यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. सदर इसम स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवतो व धार्मिक विषयावर प्रवचन देत सर्वत्र फिरत असतो. अलिबाग येथील आंबेपूर येथे शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या नावाने विविध प्रकारचे पूजा अर्चा करवितो व महिलांना विविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो.व नंतर त्यानंतर त्या महिलांचे शारिरिक मानसिक शोषण करतो त्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा करतो असे पिडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगीतले आहे. एवढे मोठे प्रकरण होऊन सुद्धा, गंभीर गुन्हा दाखल होऊनसुद्धा प्रमोद दीनानाथ केणी यांचा अजून तपास लागला नाही.याबद्दल जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रमोद दीनानाथ केणे नेमके कुठे आहेत याचा तपास रेवदंडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत.