डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत या हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.
अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी केली आहे.