कुख्यात गुंड शरद मोहोळचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

Update: 2024-01-05 11:20 GMT

Pune - कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोथरुड येथे अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान कुख्यात गुंड शरद मोहोळला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याच्यावर उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

पुण्यातील कोथरुड भागात दहशत असणाऱ्या शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या हे हल्लेखोर बाईकवरून येत या मोहोळवर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला तातडीने तेथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले होते. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Tags:    

Similar News