तुम्ही वडिलांना अग्नि दिला तुम्हाला भाऊ नाही का? ही मानसिकता बदलणार कधी?

लेकीने वडिलांना खांदा दिला तर तुला भाऊ नाही का? अशी विचारणा आजही केली जाते. याचा प्रत्यय राजस्थानमधील लेखिका डॉ. चयनिका उनियाल यांना आल्याचं पहायला मिळालं.;

Update: 2023-09-24 05:21 GMT

डॉ. चयनिका उनियाल यांनी आपल्या वडिलांना खांदा दिल्याचं आणि त्यांना अग्नि दिल्याचे फोटो ट्वीट करत ये मेरे जीवन के सबसे कठिन क्षण थे. ये पिताबेटी का यह प्यार कभी मरने वाला नहीं है असं म्हटलं होतं. त्यानंतर आप अपने पिता को अग्नि दे रही है, भाई भी होंगे आपके तो पिता को अग्नि उनका बेटा देता तो ज्यादा अच्छा रहता. वैसे पिता को अग्नि बेटा या बेटी दोनों हकदार है. लेकीन बेटा अग्नि दे तो ज्यादा अच्छा लगता, असं राम जीत पाल नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं होतं. त्यावर डॉ. चयनिका उनियाल यांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे.

डॉ. उनियाल म्हणाल्या, मै अपने माता पिता की इकलौती संतान हूँ। इकलौती इसलिए हूँ क्योंकि मेरे पिता ने एक ही संतान चाही थी। यह मेरे पिताजी थे जिनके कारण मैं अपने माता पिता और परिवार का भावनात्मक और आर्थिक दोनो रूप से ध्यान रख पाने में समर्थ बनी। इकलौती न भी होती तो भी उस संतान (चाहे बेटा हो या बेटी) को मुखाग्नि अधिकार हो जो माता पिता निष्ठा पूर्वक सेवा करे। सिर्फ लिंगीय भेद पर विशेषाधिकार नहीं मिलना चाहिए।

खरंच किती साध्या साध्या गोष्टींमध्ये लोकांकडून मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो. मुलीने वडिलांच्या पार्थिवाला खांदा देणं असो वा अग्नि देणं लोकांना पचनी का पडत नाही? मुलीने अग्नी देणं ठिक आहे पण मुलाने दिला असता तर बरं झालं असतं, असं म्हणणारी ही पुरुषी मानसिकता बदलायला हवी.



Tags:    

Similar News