राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात एसटी विलीनीकरणाचे वचन आहे का, रोहित पवार काय म्हणतात?
एसटी कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांकडे पाहून संप मागे घ्यावा, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे होऊ नये अशी अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात एसटी विलीनीकरणाचा विषय नसावा, मात्र पगारवाढीचा विषय असेल असं राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना म्हटले आहे.