कोरोनाशी लढा देत असलेले मंत्री जितेंद्र आव्हाड अखेर बरे होऊन घरी आले आहेत. बरे झालेल्य़ा जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून या पोस्ट मध्ये त्यांनी एका महिन्याच्या विश्रांती नंतर आपल्या सेवेत रुजू होईल. असं सांगितलं आहे. दरम्यान ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी 12 एप्रिलला ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यानंतर काही दिवसांनी ‘कोरोना’ची लागण झाल्याचं आव्हाड यांना समजलं होतं.
वाचा काय म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी?
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया. माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड मा.शरद पवार साहेब, जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मा.उद्धवजी ठाकरे, मा.सुप्रियाताई सुळे, मा.अनिल देशमुख, मा.जयंत पाटील, मा.राजेश टोपे, मा.मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला बळ दिले. माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती. महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल.
धन्यवाद
डॉ. जितेंद्र आव्हाड
अपने कदमों के काबिलियत पर
विश्वास करता हूं,
कितनी बार तूटा लेकीन
अपनो के लिये जीता हूं,
चलता रहूंगा पथपर
चलने मैं माहीर बन जाऊंगा
या तो मंजिल मिल जायेगी
या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.