मुंबईत पुन्हा अग्निकांड : उंच बिल्डिंगला आग, 7 जणांचा मृत्यू

Update: 2022-01-22 07:43 GMT

मुंबईतील ताडदेव भागात भाटिया रुग्णालयाच्या शेजारच्या कमला इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. या घटनेत 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात इमारती, दवाखान्यांना आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातच ऐन हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील भांडूप येथील रुग्णालयात आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेत चार बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. तर शनिवारी सकाळी मुंबईतील ताडदेव भागात भाटिया रुग्णालयाच्या समोरच्या 20 मजली कमला इमारतीतील 18 व्या मजल्यावर आग लागली. या आगीत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 28 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.

हेमंत परब यांनी सांगितले की, या घटनेतील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आगीचा कारणाचा तपास घेण्यात येत आहे. याबरोबरच या इमारतीत अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र तरीही त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. तर धुरामुळे श्वास घेण्यास अडथळा आल्याने अनेक रुग्णांची प्रकृती खराब झाली आहे, असे परब यांनी सांगितले.

मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. तर इमारतीत आणखी लोक अडकले असण्याची भीती आहे. तर गंभीर प्रकृती असणाऱ्या रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दुर्घटनेच्या ठिकाणी दाखल झाल्या. तर 13 फायर इंजिन आणि 7 जंबो टँकच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Tags:    

Similar News