भारतात मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून आता ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटनेही डोकं वर काढल्याने सर्वांची चिंता आणखी वाढली आहे. केंद्र सरकार लसीकरणासह इतर उपाययोजना राबवत आहे. अशावेळी केंद्राच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत खासदार अमोल कोल्हेंनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधत प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान मोंदीचा फोटो असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची जबाबदारीही घ्या' अशा शब्दात टीका केली आहे.