Rain Update : कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, प्रशासनाचा मोठा निर्णय

Update: 2023-07-26 03:59 GMT

राज्यातील पावसाने सध्या काही दिवस जोर धरला आहे. कोकण पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून अतिमुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोकणात रत्नागिरी, रायगड मध्ये नद्यांचे पात्र ओलांडून ओसंडून वाहात आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातल्या या सततच्या पावसामुळे प्रशासन आणि यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. रात्रीपासून पावसाने नवी मुंबई आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यातील शाळेला सुट्टी देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये या करिता जिल्ह्यातील सर्वच शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी देखील जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.



 



Tags:    

Similar News