700,0000000 रूपयांची उधळपट्टी करदात्यांच्या पैशावर मोदींची जाहीरातबाजी

करदात्यांच्या पैशावर जाहीरातींसाठी मोदींनी केली 700,0000000 रूपयांची उधळपट्टी कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना केंद्रातील मोदी सरकारने सरत्या वर्षात जाहीरातींपोटी दिवसाला 1.95 कोटी खर्चून 713.20 कोटींची उधळपट्टी केल्यांचे माहीतीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

Update: 2020-11-02 07:00 GMT

अवघा देश कोरोनारुपी महामारीच्या संकटाला सामोरे जात असताना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं संकट उद्भवलं आहे. देशाच्या विकासदर उणे झाला असताना सरत गेल्या वर्षीच्या जाहिरातींवर मोदी सरकारने 713.20 कोटी रुपये खर्च केल्याचे माहीतीच्या अधिकारातून उघड झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात नरेंद्र मोदी सरकारने वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डिंग्ज इत्यादींच्या जाहिरातींच्या माध्यमातून स्वत: ची जाहिरात करण्यासाठी करदात्यांचे सुमारे 713.20 कोटी रुपये खर्च केले. माहीतीचा अधिकार कार्यकर्ते जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशनने केंद्र सरकारच्या सन 2019-20 दरम्यानच्या जाहिरातींवर दररोज सरासरी 1.95 कोटी रुपये खर्च केले आहेत.

जाहीरातीपोटी खर्च झालेल्या एकुण रकमेचे विवरण देताना ब्युरोने छापील जाहिरातींसाठी 295.05 कोटी रुपये वितरित केले गेले तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर 317.05 कोटी रुपये आणी आऊटडोर जाहिरातींसाठी 101.10 कोटी रुपये देण्यात आले. यामधे परकीय माध्यमांद्वारे प्रसिद्धीसाठी सरकारने खर्च केलेल्या जाहिरातींच्या रकमेची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

जून 2019 मध्ये मुंबईतील माहीतीच्या अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयाने असे म्हटले होते की त्यांनी करदात्यांचे मुद्रण, इलेक्ट्रॉनिक, मैदानी माध्यम आणि मुद्रित प्रसिद्धीसाठी Rs 3,767.2651 कोटी रुपये खर्च केल्याची कबुली दिली होती. त्याआधी एक वर्ष अगोदर, मे 2018 मध्ये, मंत्रालयाने गलगलींनी दिलेल्या दुसर्‍या माहिती अधिकारात असे उघडकीस आले होते की, जून 2014 मध्ये भाजपा सरकारने सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारच्या जाहिराती व प्रसारमाध्यमावर 4,343.26 कोटी रुपये खर्च झाला.

Tags:    

Similar News