जनतेला गृहीत धरून स्वार्थासाठी पक्षांतर करणारे अथवा या पक्षातून त्या पक्षात माकड उडया मारणाऱ्या नेत्यांवर आमचा विश्र्वास राहीला नाहीये. जनतेला गृहीत धरून ज्या नेत्यांनी राजकारण सुरु केलं आहे त्यांना आम्ही या विधानसभा निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा संतप्त सूर नांदेड येथील नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त झालाय.