Ajit pawar security lapse : अजित पवार यांना सोडून ताफा गेला उध्दव ठाकरे यांच्यासोबत

Ajit pawar security Breach : अजित पवार यांचा ताफा त्यांना साडून उध्दव ठाकरे यांच्यासोबत गेला. त्यामुळे अजित पवार यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली.;

Update: 2023-04-17 02:45 GMT

रविवारी महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Program) कार्यक्रमाच्या ठिकाणी उष्माघातामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोक अत्यवस्थ अवस्थेत कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital ) दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांची आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit pawar) एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अजित पवार यांना सोडून सुरक्षा ताफा उध्दव ठाकरे यांच्यासोबत गेल्याचं पहायला मिळाले.

उध्दव ठाकरे आणि अजित पवार कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रुग्णांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी आधी उध्दव ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत केली. त्यानंतर अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. मात्र त्यावेळी उध्दव ठाकरे हे गाडीत बसले. उध्दव ठाकरे यांच्यानंतर अजित पवार गाडीत बसण्यासाठी निघाले. मात्र अजित पवार यांना माध्यमांनी आणखी काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजित पवार पुन्हा माध्यमांशी बोलायला लागले. मात्र अजित पवार यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने अजित पवार गाडीत बसले आहेत की नाहीत? याची खात्री न करता उध्दव ठाकरे यांच्या गाडीच्या मागे गाडी काढली. यावेळी अजित पवार यांचा सुरक्षा ताफाही या गाडीसोबत उध्दव ठाकरे यांच्यासोबत गेला. (Ajit pawar convoy left with Uddhav Thackeray) मात्र त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलून झाल्यावर गाडी पाहिली तर त्याठिकाणी त्यांचा ताफा नसल्याची गंभीर बाब दिसून आली. त्यावेळी अजित पवार यांनी ड्रायव्हरला फोन करून चांगलेच धारेवर धरले. जिथं असशील तिथं थांब. मी कार्यकर्त्याच्या गाडीतून येतो, असं अजित पवार म्हणाले. (Ajit pawar Angry on Driver)

अजित पवार यांचा सुरक्षा ताफा निघून गेल्याने अजित पवार संतापले होते. मात्र माध्यमांचे प्रतिनिधी सोबत असल्याने अजित पवार यांनी जास्त प्रतिक्रीया दिली नाही.


Tags:    

Similar News