कोरलई जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करा, अलिबागमध्ये किरिट सोमय्या यांचं धरणं आंदोलन

किरिट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात धरणं आंदोलन...

Update: 2021-02-10 10:36 GMT

भाजप खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरलई गावात असलेली त्यांची संपत्ती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची कोरलई गावात 10 कोटीची जमीन असून या जमिनीचा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे मुरुड तालुक्यातील कोरलई येथे 9 एकर जमीन अन्वय नाईक यांच्या कुटुंबाकडून खरेदी केली असल्याचं किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

यासर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किरिट सोमय्या यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत या सर्व प्रकरणाची चौकशी होत नाही. तोपर्यंत आपण या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Full View
Tags:    

Similar News